About Us
शतकमहोत्सवी वर्ष १००
Our Story
रसिकहो , मुंबईतील कामगार भागात सहकार व मनोरंजन या १०० वर्षापूर्वी अनोख्या वाटणान्य संकल्पनांना जन्म देणाऱ्या सहकारी मनोरंजन मंडळाची शतक महोत्सवी वाटचाल म्हणजे तिच्या संस्थापकांच्या द्रष्टेपणाची दूरदृष्टीची जिवंत निशाणीच आहे . प्रसिद्ध कामगार नेते कै . ना . म . जोशी यांनी कै . गंगाराम बाबाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवा संघाला पूरक अशा सहकारी मनोरंजन मंडळाची दि . २० सप्टेंबर १ ९ २२ रोजी स्थापना केली , ही मराठी रंगभूमीवरील एक ऐतिहासिक घटना मानावी लागेल.

Take refuge in our greenery and away from the crowds.

Our Specialties
Consequat facilisi ultricies integer eu nibh pellentesque. Morbi ac sit ultrices quis dignissim lectus. Pellentesque nisl, ac, bibendum arcu vestibulum aliquam.


Meet The Team of NYUS.
-
आमची कहाणी
शंभर वर्षापूर्वीचा गिरणगाव म्हणजे बारा बारा तास गिरण्या कारखान्यातून घाम गाळणाऱ्या , पण श्रमाला प्रतिष्ठा नसलेल्या मुंबईच्या कामगारांचा दुर्लक्षित मागास विभाग , त्यांच्या दुःख , दैन्याला कोणी वालीच नव्हता . दारु , जुगार असली व्यसन आणि पठाणी कर्जाचा विळखा यांच्या कर्दमात तो अधिकाधिक रुतत चालला होता . अशा स्थितीत ‘ सांस्कृतिक उन्नती वगैरे शब्दों कोणाला सुचणं शक्य नव्हतं . अशा सर्वस्वी प्रतिकुल परिस्थितीत या कामगारांमधील कलागुणांना वाव मिळावा व त्याची सामाजिक व सांस्कृतिक जाण वाढावी व व्यसनमुक्त होऊन तो अन्यत्र बहकु नये म्हणून या सहकारी मनोरंजन मंडळाची स्थापना करण्यात आली. दामोदर हॉल बांधल्यानंतर मंडळास हक्काचा निवारा मिळाला आणि व्यावसायिकांच्या दिंड्या या पंढरीच्या वाटेला लागल्या.